तांबूस चंद्रॊदय!

येत्या ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला आकाशात एक अद्भुत घटना पहावयास
मिळणार आहे. त्यादिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे, आणि अशावेळी चंद्र दिसेनासा होत नाही,
पण त्यावर सुंदर तांबूस रंग चढतॊ!
आणि त्यातून यावेळी ग्रहण नेमके चंद्रोदयाच्या वेळेला आहे, म्हणजे आणिकच सुंदर, आणि
जागरणाची गरज नाही.
तर चला, हे विलक्षण दृश्य पहायची तयारी करू या! किंबहूना तांबूस चंद्रॊदयाच्या उजेडात
पिक्‍निक्‍ करू या!
चंद्रग्रहण पाहण्यात धोका अजिबात नाही, ना त्यासाठी काही साधनसामुग्रीची गरज आहे.
मुख्य तयारी म्हणजे आपापल्या ठिकाणी चंद्रोदयाची नेमकी वॆळ काय आणि पूर्वेकडील
क्षितीज नीट दिसेल अशी जागा कोणती हे शोधणे.
संपूर्ण ग्रहण संध्याकाळी ६:२२ वाजता सुरु होईल, आणि अंदाजे एक तास चालेल. तदनंतर
ग्रहण खंडग्रास होईल व दोन तासांनी संपेल.
या निमित्ताने आपल्याला चंद्र-सूर्य- ग्रहमालेबद्दल अधिक माहिती करून घेता येईल आणि
ग्रहणासारख्या अद्भुत पण नैसर्गिक प्रक्रियांचे वैज्ञानिक पद्धतीने आकलन करून घेता येईल.
या संधीचा फायदा घ्या, इतरांनाही सुचवा. अधिक माहिती या दोन website वर मिळेल:
https://coppermoon18.wordpress.com
आणि
https://www.iiap.res.in//people/personnel/pshastri/grahana/grahana.htm

Advertisements